मुंबई-पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद; राज्यात संचारबंदी लागू होण्याची शक्यता

मुंबई-पुणे महामार्ग वाहतुकीसाठी बंद; राज्यात संचारबंदी लागू होण्याची शक्यता

मुंबई : राज्य सरकार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध पाऊले उचलताना दिसत आहे. दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे वृत्त समजते आहे. तसेच नुकतेच राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी राज्यात संचारबंदीची मागणी केली आहे.

दरम्यान कोरोना व्हायरसची संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्यातील जनताही त्याला अपेक्षीत सहकार्य करत आहे. मात्र एवढे असूनही काही लोक रस्त्यावर गर्दी करताना दिसून येत आहेत. राज्यात जमावबंदी आदेश लागू करुनही लोक ऐकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे ठोस उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार राज्यात संचारबंदी लागू करण्याबाबत विचार करत आहे.

आज सकाळीही मुंबई आणि पुण्यातील टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. काल दिवसभर कर्फ्यू मुळे निर्माण झालेले वातावरण क्षणार्धात अंत पावले. विशेष म्हणजे खासगी कंपन्या, दुकाने, सर्व काही बंद आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु आहेत.

कोरोना व्हायरस नियंत्रणात आणत असताना केंद्र, राज्य सरकारचे जे कर्मचारी, आरोग्य विभाग, पोलीस, तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू आयोजित करण्यात आला. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. परंतु सायंकाळी पाच वाजता लोकांनी रस्त्यावर ताट, पितळ्या वाजवून किंवा घंटानाद करुन आभार प्रदर्शन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com