दिंडोरी : मोटरसायकल पुलावरून कोसळल्याने पत्नीचा मृत्यू तर पती जखमी
स्थानिक बातम्या

दिंडोरी : मोटरसायकल पुलावरून कोसळल्याने पत्नीचा मृत्यू तर पती जखमी

Gokul Pawar

पिंपरखेड : दहीवी गावाजवळील पुलावरून मोटर सायकल कोसळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनाली विश्वास शिंगाडे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

दरम्यान दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते भनवड रस्त्यात दहिवी गावालगत हा अपघात झाला.

गावाजवळील पुलावरून दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने गाडी थेट पुलाखाली कोसळली. गाडीवर दोघे पती पत्नी होते. यात पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे.

Deshdoot
www.deshdoot.com