Thursday, April 25, 2024
Homeनाशिककष्टाचं फळ मिळतंच; आ. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

कष्टाचं फळ मिळतंच; आ. नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया

नाशिक : विधानसभा उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार नरहरी झिरवळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस असून आजच उपाध्यक्षांची निवड करण्यात आली.

भाजप आमदार अशोक उईके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisement -

झिरवाळ हे नाशकातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. झिरवाळ हे अजित पवारांनी फडणवीसांच्या साथीने सत्तास्थापन केल्यानंतर काही दिवसांसाठी गायब झाल्याने चर्चेत आले होते. मात्र काही दिवसांनंतर शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानीच नरहरी झिरवाळ सापडले होते. झिरवाळ यांनी तेव्हा ‘माझी छाती फाडली तर पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर दिल्याने ते माध्यमांच्या प्रकाशझोतात आले होते.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये सत्तास्थापन केल्यानंतर झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवत त्यांच्या पक्षनिष्ठेला न्याय दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या