Video : आमदार खोसकर जेव्हा इंदुरीकरांच्या कीर्तनात टाळकरी होतात; व्हिडीओ बघाच…
स्थानिक बातम्या

Video : आमदार खोसकर जेव्हा इंदुरीकरांच्या कीर्तनात टाळकरी होतात; व्हिडीओ बघाच…

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : महाराष्ट्रात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सर्वश्रुत आहे. पण या कीर्तनात जेव्हा इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर टाळकरी होत दोन तास कीर्तनात थांबतात… तेव्हा बसलेल्या सर्वांनाच हायसे वाटते.

झालं असं… इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथे शाकंबरी देवीच्या उत्सवानिमित्त निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कीर्तनासाठी परिसरातील हजारो लोकांची उपस्थिती होती. कीर्तन सुरु झाल्यावर आमदार हिरामण खोसकर यांनी इंदुरीकर यांच्या पाय पडत टाळ हातात घेत टाळकरी म्हणून उभे राहिले. पुढील दोन तास उभे राहत इतर टाळकऱ्यांना त्यांनी साथ दिली.

यावेळी कीर्तन करतांना इंदुरीकर महाराजांनी त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले कि, आमदार असूनही हा माणूस तब्ब्ल दोन तास उभा होता. त्यांच्याकडून इतर कार्यकर्त्यांनी शिकले पाहिजे. तुमच्या तालुक्याला चांगला माणूस लाभला आहे, त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, असे म्हणत इंदुरीकर महाराजांनी आपल्या खास शैलीत त्यांची स्तुती केली.

Deshdoot
www.deshdoot.com