Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकयेवला : मेथीला कोणी घेईना, खर्चही निघेना; शेत जनावरांच्या हवाली

येवला : मेथीला कोणी घेईना, खर्चही निघेना; शेत जनावरांच्या हवाली

येवला : तालुक्यातील बल्हेगाव येथील तरुण शेतकरी राकेश जमधडे यांनी मेथीच्या भाजीला भाव मिळत नसल्याने संतप्त होत या शेतात जनावरे चरण्यास सोडली. दरम्यान, आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाजीपाल्याचे भाव गडगडले आहेत.

सध्या मेथीची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने 50 पैसेसुद्धा मेथीची जुडी कोणी घेत नसल्याने केलेला खर्चपण निघणे अवघड झाले आहे. या बिकट पार्श्वभूमीवर शेतकर्‍याने आपली जनावरे मेथीच्या शेतात चरण्यासाठी सोडून दिली. शेतकर्‍यांनी कांद्याची रोपे नसल्याने मेथीला पसंती दिली. मात्र, मेथीला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यावर दररोज मेथी उपटून जनावरांना खाऊ घालण्याची वेळ आली आहे. बियाणांसाठी केलला खर्च वसूल झाला नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने मेथीला 50 पैसेसुद्धा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बियाण्यासाठी एकरी दहा ते पंधरा हजार रुपये खर्च झाला असताना पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे मेथीच्या पिकात जनावरे चरण्यास सोडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, शासनाने भाजीपाला पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.

मेथी महिना-दीड महिन्यात येत असल्याने बर्‍याच शेतकर्‍यांनी कांद्याची रोपे नसल्याने मेथिला पसंती दिली. मात्र मेथीचे भाव गडगडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
-राकेश जमधडे, शेतकरी, बल्हेगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या