Friday, April 26, 2024
Homeनाशिकराज्यातील दहा हॉट शहरात नागपुर; उत्तर महाराष्ट्रात पारा ४० अंशाच्या वर

राज्यातील दहा हॉट शहरात नागपुर; उत्तर महाराष्ट्रात पारा ४० अंशाच्या वर

नाशिक : राज्यात गेल्या आठवड्यापासुन कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली असुन राज्यातील सर्वच भाग चांगलाच तापला आहे. करोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असतांना पारा देखील वर गेल्याने नागरिकांना दुहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

मागील पंधरा दिवसापुर्वी वाढलेल्या तापमानामुळे काही भागात अवकाळी पाऊस झाल्यानंतर उन्हाचा चटका वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रातील पारा ४० च्यावर गेल्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान आज देशातील १० सर्वाधिक कमाल तापमान असलेल्या शहरात नागपुरचा समावेश झाला आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या सहा सात दिवसात कमाल तापमानात लक्षणिय अशी वाढ झाली असल्याने सर्वच भागात आता सुर्याचा प्रकोप बघायला मिळत आहे.

राज्यात एकीकडे करोना रुग्णांची सख्या वाढत असतांनाच दुसरीकडे जनता करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबोहर न पडणार्‍या नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे. या वाढत असलेल्या तापमानामुळे विदर्भात काही भागात अलिकडे अवकाळी पाऊस होऊन याते शेतीमालाचे नुकसान झाले आहे. या वाढलेल्या तापमानाची मोठी झळ विदर्भ व मराठवाड्याला बसत आहे.

नागपुर व भंडारा येथे ४४ अंश सेल्सीअस असे सर्वाधिक जास्त कमाल तापमानाची नोंद झाली असुन नागपुरची देशांतील आजच्या दहा हॉट शहरात नोंद झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे आता पावसाचे वातावरण निर्माण होत असुन यामुळे अनेक भागात पाऊसाचे वातावरण कायम आहे.

राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद अकोला या ठिकाणी ४१.४ अंश सेल्सीअस अशी झाली आहे. तसेच जळगांव ४१, मालेगांव ४०.२, परभणी ४०.५, अमरावती ४०.४, चंद्रपुर ४०.२, नांदेड ४०, सोलापूर ४०.२, वर्धा व बीड ४९.९, नागपुर ३९.३, नाशिक व पुणे ३८.१ सांगली ३७, सातारा ३८.३, बुलढाणा ३७.४, कोल्हापूर ३६.८, गोदीया ३६.२ अशा तापमानाची आज नोंद झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या