स्थानिक बातम्या

राष्ट्रवादीच्या दोन्ही सभागृहातील सदस्य एक महिन्याचे वेतन देणार : शरद पवार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहायता निधी’साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन ‘प्रधानमंत्री सहायता निधी’साठी देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. ह्या जागतिक महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सारखी पावले उचलावी लागल्याने लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले आहे. या अभूतपूर्व संकट काळात यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले.

दरम्यान दोन्ही सभागृहातील सदस्यांना कळविण्यात आले असून प्रत्येकाचा धनादेश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे जमा करण्यास सांगितले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com