Thursday, April 25, 2024
Homeनाशिकपेठ तालुक्यात आळंबीचा प्रयोग होतोय यशस्वी; विक्रीतून दोन लाख रुपये नफा

पेठ तालुक्यात आळंबीचा प्रयोग होतोय यशस्वी; विक्रीतून दोन लाख रुपये नफा

कोहोर : पेठ तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस कसत असलेल्या पारंपरिक पिकांमधून कमी उत्पन्न निघत होते. त्यामुळे पिकांवर झालेला खर्च व घरखर्चाला आर्थिक बाब कमी पडत होती. यामुळे पारंपरिक पिकांव्यतिरिक्त शेतीबरोबरच कमीतकमी भांडवल उभा करणे आणि त्यातून छोटा उद्योग सूरु करणे, गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे लक्षात आले.

आणि त्यातून अधिकाधिक उत्पादन घेणे व स्थानिक बाजारपेठेतच त्याची विक्री करणे, म्हणून तालुक्यातील तब्बल पन्नास लहान -मोठ्या शेतकऱ्यांने शेतीबरोबरच मशरुमचे उत्पादन घेतले असून त्याच्यातून शेतीच्या खर्चासह शेतकरी नफा कमवित असल्याचे आशादायी चित्र आहे.

- Advertisement -

पेठ तालुक्यात कृषी विभाग, आत्माप्रकल्प, आदिवासी विकास विभाग व कृषी विज्ञान केंद्र मुक्तविद्यापीठ आणि वनराज फार्मस प्रोडूसर या कंपनीमार्फत तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांना अंळबीच्या उत्पादनाबाबत प्रशिक्षण दिले होते. यापैकी पन्नास शेतकऱ्यांने घरच्याघरी मशरुमचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

पेठ तालुक्यात सुरु केलेल्या या मशरुम प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना, बचत गटातील महीलांना आणि मजुरांना आपल्या घरातच लहान जागेतही सहज उत्पादन घेता येत असल्याने आर्थिक टंचाईवर मात करणे सुलभ झाले आहे. या लघु उद्योगामुळे घरच्याघरी भाताचे तणस, गव्हाचे काड, नागली, उडीद आणि तुरीचापाला हा कच्चा माल पारंपरिक पिकांतून शेतकऱ्यांला सहज मिळतोय. त्यामुळे आळंबीच्या उत्पादनाला भाग भांडवल व इतर खर्च खूप कमी लागतोय. ही शेतकऱ्यांसाठी खास जमेची बाजू आहे.

या कच्या मालावर आळंबीचे उत्पादन घेण्यासाठी स्पाँन (आळंबीबीज) बँगा, फार्मोलिन कंपनीकडून तालुक्यामध्येच उपलब्ध होते व उत्पादित मशरुम फ्रेश, ड्राय कंपनीमार्फतच खरेदी करुन विक्रीही खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ मोठ्याप्रमाणात वाचतो आहे.

मशरुम(आळंबी) आरोग्यासाठी गुणकारी

धिंगरी आळंबी शंभर टक्के शाकाहारी आहे. त्यात उच्च प्रतीची प्रथिने आहेत. खनिज पदार्थात पालाद, स्फुरश, कँल्शियम, लोह, सोडीयमचे प्रमाण लक्षणीय आहे.

भाजीपाल्याच्या तुलनेत बी-१ ,बी-२ आणि ‘क’ जिवनसत्व यांचे प्रमाण अधिक आहे. अळंबीच्या प्रथिनामध्ये अँमिनो आम्ले, अधिक प्रमाणात व मानवी शरीर वाढीस पोषक आणि पचनास हलके आहेत. तसेच जिवाणू, बुरशी, आणि विषाणू यांनादेखिल प्रतिकारक शक्ती असलेली प्रथिने आळंबीत आहेत. आळंबीत पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यअल्प असल्याने उच्च रक्तदाब असणाऱ्याना गुणकारी आहेत. आळंबी सेवनामुळे व त्यातील औषधी गुणधर्मामुळे लठ्ठपणा, उच्चरक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हृदयरोग, पोलिओ, दमा, फुफूसाचे रोग, वंधत्व, जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिबंध होतो.

तालुक्यात पारंपरिक शेतीव्यतिरिक्त इतरही आधुनिक पिके घेण्याचा प्रयोग माझ्या शेतीत यशस्वी केलेले आहेत. तसेच मशरुमचा प्रयोग हा नवीन होता. तरीही बीजोत्पादन करण्याचे धाडस केले, आणि सद्यस्थितीत लॉकडाउनमध्ये मशरुम विक्रीतून दोन लाख रुपये मिळविले.
— यशवंत गावंढे प्रयोगशील शेतकरी, गावंधपाडा ता.पेठ

- Advertisment -

ताज्या बातम्या