मखमलाबाद रोड परिसरात विवाहितेची आत्महत्या
स्थानिक बातम्या

मखमलाबाद रोड परिसरात विवाहितेची आत्महत्या

Gokul Pawar

नाशिक। राहत्या घरी विवाहितेने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना गुरुवारी (ता.20) सायंकाळी मखमलाबाद रोड परिसरात घडली.
शालिनी दिलीप चव्हाण (22, रा. क्रांतिनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) असे आत्महत्या करणार्‍या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रांतिनगरमध्ये भाड्याच्या घरात राहणार्‍या शालिनी चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास साडीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com