संसरी येथे विषारी औषध सेवन करून विवाहितेची आत्महत्या
स्थानिक बातम्या

संसरी येथे विषारी औषध सेवन करून विवाहितेची आत्महत्या

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । राहत्या घरी विषारी औषध सेवन करून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना संसरीगाव येथे शुक्रवारी (दि.३१) रात्री ११ उघडकीस आली.  प्रिया पुंडलीक गोडसे (२६, रा. संसरीगाव, शेवगेदारणारोड ता. नाशिक) असे आत्महत्या करणार्‍या महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री राहते घरी गोडसे यांनी काहीतरी विषारी औषध सेवन केले. ही बाब निदर्शनास येताच पती प्रदिप गोडसे यांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले.

परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार एस.पी. शेवाळे करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com