देवळाली कॅम्प : विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; चौघांवर गुन्हा
स्थानिक बातम्या

देवळाली कॅम्प : विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; चौघांवर गुन्हा

Gokul Pawar

नाशिक । देवळाली कॅम्प परिसरात एका विवाहितेने आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.13) रात्री घडला. तीला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रीनिवास रामचंद्र साळुंके याच्यासह सासरचे चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा श्रीनिवास साळुंके (रा. चारणवाडी, देवळाली कॅम्प) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रेखा हिने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली.

याप्रकरणी विवाहितेच्या बहिणीच्या फिर्यादीनुसार, संशयित पती व सासरच्यांनी तिचा शारीरिक व मानसिक त्रास देत तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक निरीक्षक गिते हे तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com