मंंगल कार्यालय बुकींगचे पैसे परत मिळणार नाही ; क्रेडीट नोट देणार
स्थानिक बातम्या

मंंगल कार्यालय बुकींगचे पैसे परत मिळणार नाही ; क्रेडीट नोट देणार

Gokul Pawar

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात राज्यात लागु झालेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच व्यावसायिकांना बसला आहे. करोनामुळे निर्माण झालेली स्थिती जुन महिन्यापर्यत बदलण्याची शक्यता नसल्याचे याची मोठी झळ शहरातील मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल चालकांना बसली आहे.

याचपार्श्वभूमीवर मागील दोन तीन महिन्यात लग्नासाठी बुकींग केलेल्या ग्राहकांना बुकींगची अनामत परत मिळणार नसुन त्याऐवजी क्रेडीट नोट देण्याचा निर्णय नुकताच नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक शहरातील मंगल कार्यालय, लॉन्स, हॉल व बॅक्वेट हॉल यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर लागु झालेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. यामुळे नागरिकांना मोजक्या लोकांमध्ये घरातच लग्न सोहळे उरकावे लागत आहे.

या निर्माण झालेल्या स्थितीवर विचार विनिमय करण्यासाठी नुकतीच नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनची बैठक घेण्यात आली. यात मागील दोन तीन महिन्यात लग्नासाठी झालेल्या बुकींगचे पैसे परत न करण्याचा निर्णय घेण्यात आला. याऐवजी ग्राहकाला दिवाळीनंतरची तारीख बदलून दिली जाईल. तसेच ग्राहकांचे नुकसान होऊन नये म्हणुन संबंधीत ग्राहकांना एक क्रेडीट नोट दिली जाणार आहे.

ही क्रेडीट नोट ३० जुन २०२२ पर्यत आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईक किंवा मित्र परिवारातील लग्नांच्या बुकींगसाठी वापरता येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या व्यावसायावर अवलंबुन असलेल्या हजारो कुटुंबाचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीत असोसिएशनचे सेक्रेटरी सुनिल चोपडा, कार्याध्यक्ष संदिप काकड, विक्रांत मते, समाधान जेजूरकर, देवदत्त जोशी, शंकर पिंगळ, ज्ञानेश्वर सिरसाठ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com