Friday, April 26, 2024
Homeनाशिकसुरगाणा : दुसऱ्या दिवशीच्या पावसाने अनेक घरांचे नुकसान; ननाशीतही मुसळधार

सुरगाणा : दुसऱ्या दिवशीच्या पावसाने अनेक घरांचे नुकसान; ननाशीतही मुसळधार

हतगड । ननाशी : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यातील बेंडवेळ, आवळपाडा या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली आहे. तालुक्याचे तलाठी राजेंद्र सुलाने कडून पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यात आले.

दरम्यान जिल्ह्यातील सुरगाणा, सिन्नर, दिंडोरी परिसरात आजही पावसाने हजेरी लावली. सुरगाणा तालुक्यात काल (दि.२५) झालेल्या पावसाने अनेक घरांचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर आज पुन्हा येथील परिसरात बेंडवेळ, आवळपाडा या ठिकाणी पाऊसाचे आगमन झाले. तलाठी श्री.राजेंद्र सुलाने यांनी पडझड झालेल्या घराची प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले. त्यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -

ननाशी : ननाशीसह परिसरात सलग तिसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाची हजेरी

ननाशीसह परिसरात गत तीन दिवसांपासून दिवसभर दमट, ढगाळ वातावरण आणि सायकांळच्या सुमारास जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गाची चिंता अजून वाढत आहे. कारण अजून परिसरातील अनेक शेतकऱ्यांची गहू, हरभरा या पिकांची कापणी झालेली नाही .बेमोसमी पावसामुळे या पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तसेच इतर पिकांचीही हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉकडाऊन असल्याने शेतकरी नागरिक अगोदारच संकटात सापडले असतांना तीन दिवसांपासून होत असलेल्या बेमोसमी पावसाने सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या