भाऊचा धक्का ते मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू; हे फायदे होणार
स्थानिक बातम्या

भाऊचा धक्का ते मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू; हे फायदे होणार

Gokul Pawar

Gokul Pawar

मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा रो पॅक्स फेरी सेवा आणि मांडवा टर्मिनल सेवा आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील मैलाचा दगड ठरेल अशी घटना आहे. या सेवेमुळे किफायतशीर व पर्यावरणस्नेही जलवाहतुकीला प्रोत्साहन मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.

किनारपट्टीमध्ये जलवाहतूक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाऊचा धक्का ते मांडवा हे समुद्री अंतर १९ किमी असून या जलवाहतुकीने १ तासात कापता येते. रो पॅक्सची क्षमता एकावेळी ५०० प्रवासी आणि १४५ वाहने नेण्याची आहे.

गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चेत असलेला बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. बहुप्रतिक्षित अशा या रो रो सेवेची चाचणी देखील यशस्वी झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालं. मांडवा येथे या रो रो सेवेच्या रो पॅक्स टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले.

हे फायदे होणार ??

जल वाहतुकीला गती
प्रवासास सोपे
नागरिकांना सोयीस्कर
वेळेची बचत
रायगडमधील उद्योग व पर्यटनाला चालना

Deshdoot
www.deshdoot.com