निफाड : उगाव येथे सर्पाचा छळ करणाऱ्या इसमास अटक
स्थानिक बातम्या

निफाड : उगाव येथे सर्पाचा छळ करणाऱ्या इसमास अटक

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : सर्पाचा छळ करणाऱ्या एका इसमास अटक करण्यात आली असून त्यास एका दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजी श्रीपत साबळे रा. खेडे असे नाव आहे.

अधिक माहिती अशी कि, येथील नाना लोखंडे यांच्या घरात कोब्रा जातीचा सर्प निघाल्याने त्यांनी शिवाजी यांनी पकडले. यांनतर सर्पास फणा काढण्यास उद्युक्त करणे, त्याचे खेळ करणे, अमानुषपणे सर्पाचे दात काढणे अशा पद्धतीचा चाळ या इसमाकडून करण्यात आला.

येथील ग्रामस्थांनी या सदर प्रकाराचा व्हिडीओ चित्रित करून तो समाजमाध्यमांवर शेअर केला. सदर घटनेची माहिती येवला वनक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी शिवाजी (दि.०४) यास अटक केले. त्यासकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य जमा करून निफाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. येथील न्यायालयाने एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. पुढील तपास निफाड पोलीस करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com