मखमलाबाद गाव पुढील तीन दिवस लॉक डाऊन
स्थानिक बातम्या

मखमलाबाद गाव पुढील तीन दिवस लॉक डाऊन

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : शहरातील मखमलाबाद गाव पुढील तीन दिवस लॉक डाऊन असणार आहे. पंचवटी व पेठ रोड परिसरात ‘करोना’चा रुग्ण सापडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शहरातील वाढती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरातील पंचवटी तसेच पेठ रोड परिसरात एकाच दिवशी तेरा तर इतर दिवसात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मखमलाबाद गाव २९ मे ते ३१ मे पर्यत पुर्णतः बंद ठेवण्यात येत आहे.

येथील ग्रामस्थांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर गाव लॉक डाऊन केले असून कुणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन येथील ग्रामस्थांनी केले आहे. तसेच वेळोवेळी काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.

पेठ रोड भागात रुग्ण आढळल्याने तसेच बाजार समिती व गाव शहराला लागून असल्याने हा निर्णय झाला आहे. गाव पूर्णतः सॅनिटाइझ करण्यात आले आहे.
– कमलेश पिंगळे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष

Deshdoot
www.deshdoot.com