पेठ : फणस विक्रीसाठी बाजारपेठच लॉकडाऊन; शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर गदा

jalgaon-digital
2 Min Read

कोहोर : नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला पेठ तालुक्यात वर्षेनवर्ष राहत असलेल्या पाडा-वस्तीवर, तसेच माळरानावर झोपडीवजा घरे बांधून वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवानी झोपडी शेजारी दोन-चार फणसाची झाडे लावली होती. आज याच झाडांना भरघोस असे फणसं आलेली असल्याचे चित्र दिसत आहे.

दरवर्षी शेतकरी नाशिक व तालुक्याच्या आठवडी बाजारात फणसं विकण्यासाठी आणत असतात. त्यातून चांगले उत्पन्नही मिळते. मात्र मात्र कोरोना असल्याने बाजारच बंद आहे. त्यामुळे विक्री करण्यात अनेक अडचणी येत आहे.

तालुक्यात बळीराजाने गरी फणसाची रोपे घराजवळ व शेत बांधावर लावली होती. यावर्षी मात्र झाडाला मोठ्याप्रमाणात लगडलेली फणस बघायला मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाला की,  शेतकरी पडीत जागेवर अनेक फळ-फळाचे कलमी रोपे ओसाड जागेवर लावत असतोय. यंदाचे फणसं दरवर्षीपेक्षा मोठ्या प्रमाणात आल्याचे चित्र सध्या दिसत आहे. घराच्या आजूबाजूला व पडीत जागेवर लावलेल्या फणसाचे फळ आज शेतकऱ्यांला चाखायला मिळत आहे.

तालुक्यात सद्यस्थितीत फणसाच्या झाडाला चांगल्याप्रकारे फणसं आली आहेत. भविष्यात फणसांच्या इतर जातीची कलमे शेताच्या बांधावर आणि ओसाड वा पडीत जागेवर लावली तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. यासाठी शेतकऱ्यांनी नेहमीच पुढे येवून प्रयोगशील बनावे. व कृषी समृध्दी करावी.”
— देवराम ठाकरे, शेतकरी, आड बु.|| ता.पेठ

फणस हे आरोग्यदायी
फणस ही भाजी आहे किंवा फळ आहे, या बद्दल मतभेद असतील, कारण काही लोक फणसाचे गरे फळ समजून खातात, तर काहींना त्याच फणसाच्या गऱ्यांची भाजी मनापासून प्रिय असते. फणस फळ आहे किंवा भाजी आहे याबद्दल जरी मतभेद असले, तरी फणस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे, हे मात्र नक्की. फणसामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. यामध्ये अ, क, ही जीवनसत्वे, थियामीन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लाविन, नियासिन आणि झिंक सारखी पोषक तत्वे आहेत. फणसामध्ये फायबर ची मात्रा देखील भरपूर आहे.”

फणसांपासून अनेक पदार्थ तयार करता येतात

फणस हा वर दिसायला काटेरी असला तरी फणसातील महत्त्वाचा खाद्य भाग म्हणजे पिकलेले गरे. हे गरे रुचकर, मधुर व गोड असतात. पिकलेल्या फणस गरांपासून जेली, जॅम, सरबत, मुरांबा, फणसपोळी, स्क्वॅश, नेक्टतर इ. पदार्थ बनवितात. फणसापासून वेफर्स, चिवडासुद्धा बनविले जातात. कोवळ्या (कच्च्या) फणसाचा उपयोग भाजीसाठी केला जातो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *