Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोना : ग्रामीण भागात लॉकडाऊनचा फज्जा; गावाचीं सुरक्षा वाऱ्यावर?

कोरोना : ग्रामीण भागात लॉकडाऊनचा फज्जा; गावाचीं सुरक्षा वाऱ्यावर?

नाशिक : कोरोना रोगप्रसारक जीवाणु फैलावाचे पार्श्वभूमीवर धोक्याची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण देशभरात कडकडीत बंद पाळला जात आहे. पोलीसानीं शहरात बळाच्या जोरावर मुजोर नागरिकानां घरात रहायला भाग पाडले आहे. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र हा कडकडीत बंद अयशस्वी ठरतानां दिसत आहे. एकिकडे शहरे ओस पडतानां दिसत असतानाच दुसरीकडे अनेक खेडी मात्र फुलायला लागल्याचे धक्कादायक चित्र दिसुन येते आहे. या शिवाय ग्रामीण भागात अवैध धंदयानांही ऊत आल्याचे धक्कादायक चित्र दिसुन येते आहे.

कडकडीत बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सहज व सुलभ पद्धतीने संचार करता येऊ नये यासाठी पेट्रोल पंपावर पेट्रोल – डिझेल खरेदी विक्री वर अनेक बंधने लादण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे गावागावात – नाक्या नाक्यावर मात्र पेट्रोल व डिझेलची अवैधरित्या चढ्या दराने खुलेआम खरेदी विक्री जोरात सुरू आहे. याच बरोबर दारु विक्रीतही धक्कादायक रित्या वाढ झाल्याचे भयावह चित्र दिसत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार पोलीसाच्यां आशिर्वादाने व दुर्लक्षाने बिनबोभाट पणे सुरु असल्याचा आरोप सजग नागरिक करत आहे.

- Advertisement -

सहज व सुलभ रित्या उपलब्ध होणार्‍या पेट्रोल मुळे वाढत्या महिला अत्याचारासह अनेक गुन्हे घडल्याने पेट्रोल पंपावर बाटली मधुन सर्रास दिले जाणारे पेट्रोल व डिझेल विक्री बंद करणेत येत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे ईगतपुरी तालुक्यात मात्र अनेक गावात व गाव नाक्यावर सहज सुलभ पद्धतीने अवैधरीत्या मुबलक प्रमाणात पेट्रोल – डिझेल मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव चित्र दिसुन येते आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाचा गंभीर कानाडोळा असुन सदर बेकायदेशीर अवैध धंदयानां आळा बसेल का? पोलीस प्रशासन संबंधितावर कारवाईचा बडगा उचलणार का? कि पोलीसाचां आशिर्वाद असल्याने बिनबोभाट पणे हे सुरुच राहणार असा सवाल जागरुक नागरिक करत आहे.

दरम्यान एकीकडे देशभरात कडकडीत बंद पाळला जात असताना ग्रामीण भागात सर्रास नियम पायदळी तुडवत कडकडीत बंदचा फज्जा उडाला आहे. पोलीस प्रशासन शहरातच अडकुन पडले असुन ग्रामीण भागाकडे संबधिताचे दुर्लक्ष झाले आहे. याचा गैरफायदा अनेक समाज कंटक प्रवृत्ती नीं उचलला असुन अवैध धंदे जोमात सुरू आहे.

पोलीस पाटील निष्क्रिय?
कोरोना या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर गावा गावात दक्षता घेण्याचे आदेश पोलीस पाटलांना प्रशासनाने दिले आहेत. प्रत्यक्षात मात्र गावा गावात पोलीस पाटील निष्क्रिय दिसत आहे. शहरी नागरिक ग्रामीण भागात परिवार, नातेवाईक व सर्वत्र मिसळत आहे. संबधीताच्या आरोग्याची कुठल्याही प्रकारची तपासणी ची सोय ग्रामीण भागात उपलब्ध नाहीत. आरोग्य सेवक वा अन्य कर्मचारी नागरिकाचीं सुरक्षा वाऱ्यावर सोडून बेपत्ता झाले आहेत.

गावातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करण्यासाठी कसलाही उपक्रम हाती घेण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे अवैध धंदे संबंधितांच्या डोळ्यासमोर बिनदिक्कत पणे सुरु आहे. एकुणच गावांची सुरक्षा वाऱ्यावर दिसत असुन शहरातुन गावाकडे मोठ्या संख्येने होणारे पलायन, अवैध धंदयामुळे गावातील वाढता संचार यामुळे गावानां वाढता धोका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या