नांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला
स्थानिक बातम्या

नांदगाव : मजुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा कंटेनर पकडला

Gokul Pawar

Gokul Pawar

नांदगाव : भारतासह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालत असताना शहरे रिकामे होत आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने संगमनेरहून एका कंटनेर मध्ये लपून निघालेल्या २८ मजुरांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बेकायदेशीरपणे संगमनेरहुन निघालेल्या कंटनेर नांदगाव पर्यंत पोहोचला कसा, त्यांना कोणीही का? अडवले नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, सध्या देशात संचारबंदीचे वातावरण असून कोणत्याही व्यक्तीला घरवाहेर न पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच बुधवारी (दि.०१) दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील येवलारोड वरील रेल्वेगेट जवळ अज्ञात कंटेनर आला.

यावेळी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनी कंटेनर चालकास विचारले असता, चालकाने तेथून पाल काढला. लागलीच पोलिसांनी चालकाचा पाठलाग करून कंटनेरला पकडले. कंटनेरची झडती घेतली असता कंटनेर मध्ये २७ मजूर लपवलेले आढळून आले.

यावेळी वाहतूक पोलीस प्रविण गांगुर्डे यांनी कंटनेर चालकाकडे लायसन्स, आधारकार्ड, नसल्याचे चौकशीअंती आढळून आले. कंटनेर चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कंटनेर मधील मजूरांना येथील ग्रामीण रुग्णालयात चाचणी करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. कंटनेरच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून नगरपरिषदेच्या निवारा शेडमध्ये चालकासह २७ मजूरांची रवानगी करण्यात येणार असल्याचे समजते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com