जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी लीना बनसोड
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी लीना बनसोड

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.

आज (दि.१५)सकाळी त्या पदभार स्वीकारणार आहेत.पदभार घेताच दुपारी १ वाजता होणाऱ्या स्थायी समितीच्या मासिक बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत.

१९ ऑगस्ट २०१९ रोजी वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नेमणूक झालेल्या लीना बनसोड यांची अवघ्या सहा महिन्यांत पदोन्नतीने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भुवनेश्वरी एस.यांची भंडारा येथे बदली झाल्याने लीना बनसोड यांचे पदोन्नतीने बदलीचे आदेश पारित झाले आहेत..

Deshdoot
www.deshdoot.com