हातगड, त्र्यंबकला हलक्या पावसाच्या सरींचा वर्षाव
स्थानिक बातम्या

हातगड, त्र्यंबकला हलक्या पावसाच्या सरींचा वर्षाव

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हातगड येथे आज दुपारच्या सुमारास हलक्या सरींनी वर्षाव केला. तसेच त्र्यंबकेश्वर येथेही गडगडाटांसह पावसाचे आगमन झाले.

दरम्यान आज दुपारपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्र्यंबक मध्ये सायंकाळी तीन ते चार या सुमारास हलक्या सरींनी सुखद धक्का दिला. यावेळी हलक्या सारी अवघ्या पाच मिनिटासाठी आगमन केले. सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरीकांची तारांबळ उडाली नाही.

तर हतगड येथे आज १ वाजेच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण होऊन अर्धा तास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. लहान मुलांनी पावसाच्या हलक्या सरीत छत्री उघडून फिरण्याचा आनंद घेतला.

Deshdoot
www.deshdoot.com