पत्रास कारण की….. चौथीच्या मुलाचे हेडमास्तरांस पत्र
स्थानिक बातम्या

पत्रास कारण की….. चौथीच्या मुलाचे हेडमास्तरांस पत्र

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : आजारी असल्याने, वैयक्तीक कारणासाठी आपण पत्र लिहीत असतो. पंरतु एका चौथीच्या मुलाने तानाजी चित्रपट बघण्यासाठी सुट्टी मिळावी असे पत्र मुख्याध्यापकास लिहिले आहे. यानंतर हि सुट्टी देखील मंजूर झाली असून परिसरात अर्ज चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान भावेश पापालाल राहाड असे विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मालेगाव कॅम्प जवळील करंजगाव येथील बाल संस्कार सेमी इंग्लिश स्कूलमध्ये शिकत आहे. नुकतेच एका बीड मधील मुलाने आपल्या वडिलांना लिहलेले पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तर आता भावेशने लिहलेला हा सुट्टीचा अर्जही व्हायरल होत आहे.

यामध्ये त्याने लिहले आहे कि, ‘इतिहासातील शूरवीर ज्यांच्याबद्दल आम्हाला पुस्तकात फार कमी प्रमाणात माहिती आहे. अशा महाराष्ट्रातल्या मातीतील योद्धा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्याबद्दल अधिक माहिती मिळण्यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा पाहणायसाठी एक दिवसाची रजा मिळावी, हि विनंती’ अशा आशयाचा अर्ज या मुलाने केला आहे. यावर मुख्याध्यापकाने रजा मंजूर केल्याची स्वाक्षरीही या अर्जात आहे. यामुळे परिसरात हा सुट्टीचा अर्ज चर्चेचा विषय ठरला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com