निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद

निफाड तालुक्यातील तारुखेडले येथे बिबट्या जेरबंद

निफाड : तालुक्यातील तारूखेडले शिवारात गेल्या महिनाभरापासून दर्शन देणारा बिबट्या अखेरीस शुक्रवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

तारूखेडले शिवारातील शिवाजी शंकर जगताप यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या सहा दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. परंतु, तो हुलकावणी देत होता. अखेरीस दि २९ मे शुक्रवारी रात्री ९ ते १० वाजेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. शेता शेजारी असणाऱ्या वस्ती वरील विकास शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस पाटील यांना संपर्क करत तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.

वनरक्षक विजय टेकनर सह मधुकर शिंदे आदींनी तारुखेडले येथे धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. हा नर बिबट्या सुमारे पाच ते सहा वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com