त्र्यंबकेश्वर : ब्रम्हा व्हॅलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाचा मृत्यू
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर : ब्रम्हा व्हॅलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबटयाचा मृत्यू

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : नाशिक -त्र्यंबक मार्गावरील ब्रम्हा व्हॅलीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी (दि. १६) पहाटे ४ ते ५ च्या सुमारास घडली. .

दरम्यान ब्रम्हा व्हॅलीजवळ सकाळच्या सुमारास गंभीर जखमी अवस्थेतील बिबट्या ग्रामस्थांना आढळला. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचे पाय व मागच्या बाजूला गंभीर जखमा होऊन रक्तस्त्राव झाला होता. जखमी अवस्थेत त्याला चालताही येत नव्हते. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरच बिबट्याने प्राण सोडला.

यानंतर बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून अजून किती बिबट्यांचा बळी जाणार आहे, असा प्रश्न वनविभागाकडून उपस्थित केला जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com