पाथर्डी भागात आढळले बिबट्याचे बछडे; बछड्याच्या आईचा शोध सुरू
स्थानिक बातम्या

पाथर्डी भागात आढळले बिबट्याचे बछडे; बछड्याच्या आईचा शोध सुरू

Gokul Pawar

नवीन नाशिक : शहरातील पाथर्डी गावातील गोंगलेे शिवारात एक बिबट्या चा बछडा वालदेवी नदी किनारी असलेल्या सर्वे नंबर १२४ संजय कोंबडे यांच्या शेतात सकाळी ऊस तोडणीचे काम सुरू असताना आढळून आले सदर परिसरात बिबट्याचा शोध घेणे सुरू आहे.

बछडयाच्या शोधार्थ मादी येईल व पिल्लाला घेऊन जाईल यासाठी बिबट्या मादीवर वनविभागाकडून लक्ष ठेवले जात आहे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनाही सावध करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील बिबट्या निघाल्यानंतर पाथर्डी भागातील बिबट्याच्या बसल्यानंतर निर्मनुष्य झालेल्या भागांमधून बिबट्यांचा वावर वाढला असून रहिवाशांनी व नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

पाथर्डी भागात चौधरी यांच्या मळ्यामध्ये बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा ही लावण्यात आलेला आहे. मिलिटरी भाग व आजूबाजूला असलेल्या शेतीमुळे या भागात बिबट्यांचा वावर अधून मधून दिसून येत असतो त्यामुळे मळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी शासनाकडून वनविभागाकडून यासंबंधात कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com