विंचुरी दळवी : आठ दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद
स्थानिक बातम्या

विंचुरी दळवी : आठ दिवसांत दुसरा बिबट्या जेरबंद

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : येथील शिवारातील दारणाकाठी आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ऊसाच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबटया जेरबंद झाला. दरम्यान या बिबटयाची रवानगी मोहदरी येथील वनोद्दानात करण्यात आली आहे.

आधिक माहिती असे की गेल्या आठवड्यात याच ठिकाणी पहिला बिबट्या जेरबंद झाला होता तरी दुसऱ्या बिबटयाचा मुक्त संचार असल्याच्या तक्रारीनंतर वनविभागाने बिबटया जेरबंद करण्यासाठी रमेश एकनाथ कानडे यांच्या ऊसाच्या गट नंबर ६२८ शेतात दोन दिवसापुर्वी पिंजरा लावला होता. आज सकाळी कानडे यांचा मुलगा गणेश कानडे शेतात गेला असता बिबटया पिंजऱ्यात अडकल्याचे दिसले त्यानंतर वनपरिक्षेत्र आधिकाऱ्याना फोन करून बिबटया पिंजऱ्यात अडकल्याची माहिती दिली .

वनपरिक्षेत्र आधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.के. आगळे वनरक्षक कैलास सदगीर, सेवक बाबुराव सदगीर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. शाम दळवी, अनिल शेळके, प्रसाद शेळके, शिवाजी शेळके, राजेंद्र दळवी, विजय शेळके, गोकुळ शेळके, मयुर दळवी, दिलीप दळवी, सचिन जाधव, यांनी वनसेवकांना पिंजरा शेताबाहेर काढण्यासाठी मदत केली.

Deshdoot
www.deshdoot.com