देवळाली : गांधीनगर परिसरात बिबट्या जेरबंद
स्थानिक बातम्या

देवळाली : गांधीनगर परिसरात बिबट्या जेरबंद

Gokul Pawar

नाशिक : पंधरा दिवसापूर्वी वनविभागाकडून गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला.

दरम्यान देवळाली गाव व लष्करी भागात दाट जंगल असल्याने बिबट्यांची भीती कायम असते. या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर असल्याने दहशतीखाली होते. दरम्यान पश्चिम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर परिसराची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला.

त्यानंतर आज सकाळच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने वनविभागाला यश आले. यांनतर नागरिकांनीही सुटकेचा निस्वास सोडला.

Deshdoot
www.deshdoot.com