दिंडोरी : ओझे येथे बिबटयाचा दोन वस्तीवर हल्ला
स्थानिक बातम्या

दिंडोरी : ओझे येथे बिबटयाचा दोन वस्तीवर हल्ला

Gokul Pawar

ओझे : दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे एकाच रात्रीत बिबट्याने दोन मळ्यातील वस्तीवर हल्ला केला असून या हल्ल्यात एक वासरू व कुत्रा ठार झाला आहे

दरम्यान काल रात्री (दि. २१) दोन वाजेच्या सुमारास लक्ष्मण जोपळे यांच्या वासरावर हल्ला करत त्यास जागीच ठार केले तर जवळच असलेल्या संजय निगळ यांच्या वस्तीवर रात्री तीन वाजता कुत्र्यांवर हल्ला केला. या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

अनेक वेळा वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या पिंज-यांमध्ये येत नाही. सध्या बिबट्याचा मुक्काम ऊसाच्या शेतात असल्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये दहशत पसरली असून ऊसाला पाणी देणे मोठे संकट उभे राहिले आहे. विशेष म्हणजे ओझे परिसरामध्ये महावितरण कंपनीकडून शेतीसाठी चार दिवस रात्री थ्री फेंज वीजपुरवठा केला जात आहे. महावितरण कंपनीने दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com