राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘लर्न फ्रॉम होम’

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘लर्न फ्रॉम होम’

नाशिक : शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याची सूचना राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना दिली.

वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीला अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील तसेच राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासाठी टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी दैनंदिन शिक्षण आराखडा तयार करावा.

शैक्षणिक कामासाठी तयार करण्यात आलेले ई-मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावे. सर्व अधिकारी यांनी लक्ष निर्धारित काम करावे’, अशा सूचना या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी दिल्या. वंदना कृष्णा यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना कशाप्रकारे ऑनलाइन शिक्षण देता येईल, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

दीक्षा ॲप, स्मार्ट फोनद्वारे पालक, अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थी व शिक्षकांसाठी आराखडा दिल्याचे, त्याचप्रमाणे इयत्ता निहाय पालक, शिक्षकांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

विनाअनुदानित शाळांना टप्याटप्याने देण्यात येणाऱ्या अनुदानबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या. यावेळी नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ‘ऑनलाइन अधिकारी व्यावसायिक विकास मंचचे ‘ उद्घाटन प्रा. गायकवाड यांनी केले. अधिकाऱ्यांनी त्याचा योग्य उपयोग करून स्वतःचा व्यावसायिक विकास साधावा, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com