सिन्नर : बुधवारपासून तीन दिवस वावीत १०० टक्के लॉकडाऊन
स्थानिक बातम्या

सिन्नर : बुधवारपासून तीन दिवस वावीत १०० टक्के लॉकडाऊन

Gokul Pawar

वावी : कोरोना विषाणू संसर्गामुळे सर्वत्र जनजीवन भयभीत झाले आहे. मात्र, असे असताना ग्रामस्थांकडून खबरदारी घेतली जात नसून बिनदिक्कतपणे आपले व्यवहार सुरू ठेवण्याला अनेक जण प्राधान्य देत आहेत.

त्यामुळे विशेषाधिकाराचा वापर करून गग्रामविकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार येत्या बुधवार (दि.१५) पासून सलग तीन दिवस वावी गाव १०० टक्के लॉक डाऊन ठेवण्यात येणार आहे. लॉक डाऊन च्या कालावधीत गावातील एकही नागरिक अनावश्‍यक रित्या घराबाहेर पडणार नाही. सकाळी साडेसात वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रे बंद केली जातील.

याशिवाय किराणा दुकाने, भाजीपाला विक्री, पीठ गिरणी देखील बंद राहणार आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवांशी निगडित आस्थापना सुरू राहतील असे ग्राम विकास अधिकारी परेश जाधव यांनी घोषित केले आहे.

शासनाने लॉक डाऊनचा कालावधी वाढवून दिला याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात असली तरी गंभीर आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अनावश्यक रित्या घराबाहेर पडणे प्रत्येकाने स्वतःहून टाळले पाहिजे. ग्रामपंचायत क्षेत्रात तोंडाला मास्क, रुमाल न बांधता फिरणाऱ्यांवर शंभर रुपये दंड व संचारबंदी भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा जाधव यांनी ग्रामस्थांना दिला आहे.

सरपंच नंदा गावडे, उपसरपंच सतीश भुतडा, माजी सरपंच विजय काटे, माजी सभापती विठ्ठल राजेभोसले यांचे सह व्यापारी संघटना प्रतिनिधी, आरोग्य सेवक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 100% लॉक डावूनच्या निर्णय घेण्यात आला.

Deshdoot
www.deshdoot.com