नाशिकरोड : १०३८ प्रवाशांना घेऊन गोरखपुर देवराई करिता श्रमिक ट्रेन रवाना
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : १०३८ प्रवाशांना घेऊन गोरखपुर देवराई करिता श्रमिक ट्रेन रवाना

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकातून आज सायंकाळी चारच्या सुमारास उत्तरप्रदेशातील गोरखपूरला श्रमिक ट्रेन रवाना झाली. शहरासह जिल्ह्यातील १०३२ परप्रांतीय प्रवाशी होते.

नाशिकरोडहून लहान मुलांसह १०३२ प्रवासी या गाडीत बसले. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंद केली होती. या गाडीत भुसावळहून ३६५ प्रवासी बसले. त्यात जळगाव जिल्ह्यातील १५५ तर नंदुरबार जिल्ह्यातील २१० प्रवासी होते. या गाडीसाठी एकूण १३६५ विक्री झाली. तिकीट दर ६७० रुपये होते.

आज नाशिक, सिन्नर, कळवण, सटाणा, त्र्यंबक आदी तालुक्यातून परप्रांतियांना नाशिकरोड स्थानकात आणण्यात आले. गाडीत बसण्यापूर्वी त्यांना पुरी, भाजी, पुलाव व पाण्याच्या दोन बाटल्या देण्यात आल्या. स्वयंसेवी संस्थानीही मदत केली.

रेल्वेस्टेशन मास्तर आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत, रेल्वे पोलिस निरीक्षक अशोक जाधव आदींच्या मार्गदर्शनाखाली आजची मोहिम पार पडली. जिल्हा व महापालिका प्रशासनाचेही प्रतिनिधी उपस्थित होते. नाशिकरोडहून सुटलेली ही सातवी ट्रेन होती.

दरम्यान, मुंबईहून एकूण १४० रेल्वेगाड्या सोडण्यात येत आहेत. त्यातील काही गाड्या नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबत असून या प्रवाशांना रेल्वेतर्फे मोफेत नाश्ता तसेच अन्नाची पाकिटे दिली जात आहेत.

त्यासाठी आचारी, कारागीर, साहित्य सर्व तयार आहे. मेसेज येताच एक तासात जेवण तयार करण्यात येणार आहे. स्थानकातील कॅन्टीनही उघडण्यात आली आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com