त्र्यंबकेश्वर : परप्रांतीय नागरिकांची वैद्यकीय दाखल्याशिवाय होणार घरवापसी

jalgaon-digital
1 Min Read

त्र्यंबकेश्वर : परप्रांतीय मजुरांना सरकारी वैद्यकीय तपासणी दाखल्याशिवाय परतीचा प्रवास करता येणार आहे.त्यामुळे परप्रांतीय अथवा घरी परतणाऱ्या दिलासा मिळणार आहे.

सध्या लॉक डाऊन बाहेर राज्यातील नागरिकांना घरी जाण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. अनेक ठिकाणांहून रेल्वे, बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी काही नोंदणी तसेच वैद्यकीय तपासणी दाखला आवश्यक आहे. परंतु आता दाखल्याशिवाय घरी जाता येणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या नागरिकांना तालुका स्तरावर तहसील जाऊन नोंद लागत होती. अशावेळी सरकारी आरोग्य तपासणी दाखला गरजेचा होता. परंतु आता दाखला आवश्यक नसला तरी गनद्वारे थर्मल स्कँनिग थोडक्यात तापाची तपासणी करून घरी सोडण्यात येणार आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयातुन जवळपास २५० दाखले गरजूंनी
काढले होते. परंतु आता या दाखल्याची गरज नसल्याचे तहसीलदार व आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे घरवापसी करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *