Thursday, April 25, 2024
Homeनाशिकऑनलाईन शिक्षण की पॉर्न साईटला आमंत्रण? पालकांनी उपस्थित केला प्रश्न

ऑनलाईन शिक्षण की पॉर्न साईटला आमंत्रण? पालकांनी उपस्थित केला प्रश्न

नाशिक : लॉकडाऊनच्या काळात बहुतांश शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केल्यामुळे मोबाईल व लॅपटॉपवर येणार्‍या पॉर्न साईटच्या लिंकचे प्रमाण कमालिचे वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढली आहे. ऑनलाईन शिक्षण आहे की पॉर्न साईटला आमंत्रण, अशी व्यथा पालकांकडून आता व्यक्त होत आहे.

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या मोबाईल वापराचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले असून हे धोकेदायक असल्याचे मत सायबर तज्ञ व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. त्यानंतर टप्पाटप्प्याने लॉकडाऊन वाढत गेला आणि शिक्षणाची व्याख्याच बदलून गेली. शहरातील नामांकित शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे निश्चित करुन पालकांना त्यास्वरुपाच्या सूचना केल्या. झूम, गुगल मीट आदी अ‍ॅपच्या माध्यमातून दररोज दोन ते तीन तास मुलांना शिकवले जात आहे.

बालवाडीतील बालके मोबाईल समोर जास्त वेळ बसत नसल्याने पालकांनाच धडे गिरवावे लागतात. ज्या विद्यार्थ्यांना मोबाईलचा सहज वापर करता येतो त्यांच्या हाती मोबाईल सोपवून पालक निश्चित होतात. पण त्यांच्याही लक्षात येत नाही की मुले ऑनलाईन असल्यामुळे येणार्‍या लिंकवर क्लिक करुन त्यातील अश्लिल व्हिडीओ बघायला लागतात. एकदा क्लिक केल्यानंतर मुलांना या वेबसाईटची ओढ निर्माण होते आणि घरात कोणीही नसल्याचे औचित्य साधत ही मुले या पॉर्न साईट बघत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.

वयात येणारी मुले एकाकी पडत असल्याने त्यांचे नैराश्यही वाढले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी काही मुले आता फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचे बनावट अकाऊंट तयार करुन मित्र, मैत्रिणींसोबत चॅटिंग करतात. त्यातून एखादा मित्र, मैत्रिण मिळाली तर त्याच्या सोबत तासनतास चॅटिंग करण्याचे प्रकारही वाढले आहेत.

मूळात वयात आलेल्या मुलांचे मोबाईल पालक तपासून बघू शकत नाहीत आणि मुलेही पालकांसोबत आपले अनुभव शेअर करत नसल्यामुळे त्यांचे नैराश्य अधिक वाढल्याचे दिसून येते. शाळा, महाविद्यालये सध्या बंद असल्यामुळे प्रत्यक्ष भेटही घडत नाही. मनातील भावना व्यक्तच होत नसल्यामुळे मुले एकाकी पडण्याचे प्रमाणही वाढल्याचे मानसशास्त्र तज्ज्ञ सांगतात.

‘फेसबुक’द्वारे मदतीची मागणी

करोनामुळे विद्यार्थ्यांचे विश्वच बदलून गेले आहे. विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची दरी ऑनलाईन शिक्षणाने भरुन काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातही हॅकिंगचे प्रकार होत असल्याने अनेक पालकांची डोकेदुखी वाढली आहे. केवळ आर्थिक गैरप्रकार घडतात, असे नाही तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप सारखे अकाऊंट हॅक करुन त्याद्वारे मदतीची मागणी कनीाचे प्रकार हल्ली घडत आहेत.

एका शासकीय सेविकाचे अकाऊंट हॅककरुन मित्रांकडून दोने ते पाच हजार रुपयांची मदत मागितली. याविषयी संबंधित अकाऊंट धारकाने सायबर तज्ज्ञांशी संवाद साधत काय उपाययोजना करता येतील, याची माहिती घेतली. त्यांचे अकाऊंट हॅक केल्याचे उघडकीस आल्यानंतर असे अनेक प्रकार घडत असल्याचे दिसून येते.

विद्यार्थ्यांना फक्त एक तास मोबाईल दिला पाहिजे,तसेच वापर करताना त्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवले पाहिजे. तासन तास मुलांच्या हातात मोबाईल दिले तर ऑनलाईन लिंक्सवर क्लिक करताच पॉर्न साईट ओपन होतात. तसेच फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक करण्याचे प्रकारही हल्ली वाढले आहेत. त्यासाठी येणार्‍या लिंकची खात्री करुनच त्यावर पैशांची देवाण-घेवाण करावी. पैसे घेण्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा ओटीपी लागत नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. ओटीपीच्या माध्यमातून फसवणूकीचे प्रकार खूपच वाढले आहेत.
– अमर ठाकरे, सायबर तज्ज्ञ, नाशिक

अशा करा उपाययोजना
मुलांकडे दिवसभरात फक्त एकच तास मोबाईल द्या , कोणत्याही साईटला भेट देण्यापूर्वी त्याची खात्री करुन घ्या पैशांची देवाणघेवाण करताना खूप काळजी घ्या, कोणत्याही अकाऊंटमधून पैसे स्विकारण्यासाठी ओटीपी लागत नाही पॉर्न साईटला एकदा व्हिजीट केल्यास वारंवार लिंक येतात. त्यांना बॅन करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या फेसबुक, जीमेलचा पासवर्ड महिना, दोन महिन्यांना बदला प्रत्येक वेळी पासवर्ड बदलताना ८० टक्के बदल झाला पाहिजे नाव, जन्मतारीख, वर्ष यांचा पासवर्ड म्हणून वापर करु नका पासवर्डमध्ये स्पेस या बटनाचा वापर केल्यास उत्तम.

- Advertisment -

ताज्या बातम्या