दिंडोरी तालुक्यात करोनाचा शिरकाव; ग्रामीण भागात करोनाची संख्या ६० वर
स्थानिक बातम्या

दिंडोरी तालुक्यात करोनाचा शिरकाव; ग्रामीण भागात करोनाची संख्या ६० वर

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा शिरकाव वाढला असून दिंडोरी तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तर विंचूर मध्ये दोन रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाची आकडा ६० वर पोहचला आहे. तर दोघे करोनामुक्त झाले आहेत. आज सकाळी आलेल्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. दिंडोरी तालुक्यात कोरोनाने खाते उघडले असून ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर विंचूर येथे दोघे करोना बाधित आढळले आहेत.

दरम्यान दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथे हा रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर आधीपासूनच उपचार सुरू आहेत. परंतु आता धोका वाढला असून नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात नाशिक महापालिका क्षेत्रात १३ रुग्ण तर नाशिक ग्रामीण मध्ये ३ रुग्ण करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव मध्ये २१ बाधित रुग्ण आढळले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com