इंदिरा नगर पोलिसांनी सापळा रचत सराईत गुन्हेगारास केली अटक

इंदिरा नगर पोलिसांनी सापळा रचत सराईत गुन्हेगारास केली अटक

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास इंदिरानगर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल होते फरार असलेला संशयित आरोपी मन्ना उर्फ गोविंदा भारत गांगुर्डे , वय – ३३ , रा – फलॅट नं ० ९ , निसर्ग गोविंद सोसायटी , मंगलमुर्तीनगर , उपनगर , हा अनेक दिवसांनपासुन पोलीसांना हुलकावणी देत होता .

(दि .१२) शुक्रवार रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर व स पो नि राकेश भामरे यांना माहिती मिळाली की, मन्ना उर्फ गोविंदा भारत गांगुर्डे हा उपनगर नाक्यावर येणार असल्याची खात्रीशिर माहिती मिळाल्याने उपनगर नाक्यावर सापळा रचला असता दुपारच्या सुमारास फरार संशयित मन्ना उर्फ गोविंदा भारत गांगुर्डे हा तेथे आला. त्यास पोलीस आल्याची चाहुल लागल्यानंतर त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीसांनी मोठ्या शिताफिने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पोलीस उपायुक्त विजय खरात सहा पोलीस आयुक्त अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वपोनि निलेश माईनकर, सपोनि राकेश भामरे, पोउपनि जगदाळे, पाळदे, राठोड यांनी केली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com