Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकदेवळा : तालुक्यातील चार व्यक्तींना तातडीने होम क्वारंटाईन

देवळा : तालुक्यातील चार व्यक्तींना तातडीने होम क्वारंटाईन

देवळा : चांदवड येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने दक्षतेच्या दृष्टीने या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या देवळा तालुक्यातील चार व्यक्तींना तातडीने होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष मांडगे यांनी आज शनिवार (ता.११) रोजी दिली.

चांदवड येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे काल लक्षात आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला. त्यात देवळा तालुक्यातील चार व्यक्ती संपर्कात आल्याचे समजताच त्यांचा तातडीने शोध घेण्यात आला. तालुक्यातील चिंचवे, भावडे, खालप व देवळा गावातील हे चारजण असून हे चांदवड टोलनाक्यावरील कर्मचारी असल्याचे समजते.

- Advertisement -

आरोग्य विभागामार्फत त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यांच्यात कोरोनाची कोणतीच प्राथमिक लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून १४ दिवसांसाठी त्यांना त्यांच्या घरीच अलग राहण्यास सांगण्यात आले. यावर आरोग्य विभाग त्यांचेवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

देवळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी पारित केला असून या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून ५०० रु.दंड वसूल करण्याची कारवाई करण्यात येणार आ

- Advertisment -

ताज्या बातम्या