सुखोई अपघातग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ भरपाई द्या : पालकमंत्री छगन भुजबळ

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । वायूदलाचे सुखोई विमान पिंपळगाव बसवंत येथे कोसळून द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांचे मोठे नूकसान झाले होते. ‘एचएएल’कडून त्यांना प्रत्येकी चौदा लाख रुपयाची मदत देण्यात आली. मात्र, ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याप्रश्नी बैठक झालेल्या नूकसानी इतकी आर्थिक मदत दिली जावी, असे आदेश दिले.

भुजबळ यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.18) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. त्यास जिल्हाधिकारी सूरज मांढरे व विमान अपघातग्रस्त शेतकरी उपस्थित होते. जून 2018 साली वायुदलाचे सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झाले यामध्ये पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्षे लोटले तरी एचएएलकडून कंपनीकडून नूकसानग्रस्त शेतकर्‍यांना चौदा लाखांची मदत देण्यात आली.

या प्रश्नी शेतकर्‍यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. बैठकीत शेतकर्‍यांनी त्यांच्या अडचणी भुजबळांसमोर मांडल्या. कंपनीने शेतकर्‍यांना देऊ केलेली रक्कम केवळ 14 लक्ष रुपये एवढी असून वास्तविक स्वरूपात 14 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. भुजबळ यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या लक्षात घेत नूकसान भरपाईची रक्कमेत वाढ केली जावी अशी सूचना केली.कंपनीने केवळ विम्याच्या बदल्यात मिळणार्‍या पैशा व्यतिरिक्त शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या प्रमाणात मदत द्यावी.

यासाठी एचएएलने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून त्यांच्या वरिष्ठ विभागास पाठवावा व तातडीने मदत दयावी, असे आदेश दिले. बैठकीस आ. दिलिप बनकर, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर यांच्यासह एचएएल विभागाचे अधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *