Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिडलाखाचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिडलाखाचा मद्यसाठा जप्त

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने विल्होळी शिवारात छापा टाकून लॉकडाऊन असतानाही बेकायदा मद्याचा साठा करणाऱ्या दोघांना आज (दि.२४) अटक केली. त्यांच्याकडून सुमारे दिडलाखाची देशी मद्याच्या २ हजार ५०० सीलबंद बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.

नवनाथ चंदू धोगंडे (२६ रा.सारुळ, ता.जि. नाशिक) व प्रकाश कन्हैयालाल खेमाणी (५९, रा.बोधलेनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यात बेकायदा मद्यसाठा करून विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकास मिळाली होती . त्यानुसार दुय्यम निरीक्षक आर. आर.धनवटे, एम. आर.तेलंगे, सी.एच. पाटील, जवान विजेंद्र चव्हाण, जी. आर. तारे, आर. बी. झनकर, के.सी.कदम, डी. के.गाडे आदींच्या पथकाने शुक्रवारी (दि.२४) नाशिक तालुक्यातील विल्होळी शिवारात सापळा रचून छापा टाकला.

एका घरात पथकास मध्यप्रदेशमध्ये विक्रीस मान्यता असलेल्या देशी मद्याच्या १८० मिलीच्या २ हजार ५०० सीलबंद बाटल्या असा सुमारे १ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्या. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या