पेठ : तंबाखूची ट्रकद्वारे अवैध वाहतूक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक बातम्या

पेठ : तंबाखूची ट्रकद्वारे अवैध वाहतूक; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Gokul Pawar

पेठ : करोनाच्या साथीचा प्रसार थांबविणेसाठी तंबाखु विक्री, वाहतुक यांना प्रतिबंधीत केलेले असतांनाही गुजरातमधून महाराष्ट्रात आणला जाणारा ५ लाख ३९ हजार ३३० रुपये किमतीची तंबाखुची वाहतुक करणारा ट्रक महाराष्ट्राच्या हद्दीतील सिमारेषेवरील चेकनाक्यावर पकडण्यात आला.

महाराष्ट्र – गुजरात सिमारेषेवरील पिठुंदी नाक्यावर आंतरराज्य होणारी वाहतुकीची तपासणी करण्यासाठी असणाऱ्या नाक्यावर रात्री अकराच्या सुमारास गुजरातमधून आयशर ट्रक क्र .जीजे २३ एटी ४५२६ क्रमांकाच्या ट्रकची तपासणी करण्यात आली. यांनतर मास्क न लावण्यावरून ट्रक ड्राइवर आणि पोलीस यांच्यात वाद झाले. ट्रक तपासणी दरम्यान यामध्ये बंदी असलेल्या तंबाखुची साठा सापडला.

याप्रकरणी ट्रक ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी ट्रक मधून सुमारे ५ लाख ३९ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. नि. राधेश्याम गाडेपाटील यांचे मार्गदर्शनाखाली हवा. पाटील अधिक तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com