नाशिकरोड : जाखोरी येथे किरकोळ वादातून पतीकडून पत्नीचा खून
स्थानिक बातम्या

नाशिकरोड : जाखोरी येथे किरकोळ वादातून पतीकडून पत्नीचा खून

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिकरोड : घरगुती वादातून नाशिक रोड येथील जाखोरी येथे पतीने पत्नीवर वार करून ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.

जाखोरी या ठिकाणी राहत असलेले शिवाजी माळी यांचे पत्नी मीना उर्फ ज्योती माळी यांच्यासोबत (दि.१३) ९: ३० च्या सुमारास भांडण झाले. या भांडणात मी माहेरी निघून जाईल असं पतीला सांगितले. याचाच राग आल्याने पती शिवाजी माळी यांनी जवळ असलेल्या कोयत्याने पत्नीवर सपासप वार केले.

या हल्ल्यात पत्नी मीना माळी यांचा मृत्यू झाला आहे तर हल्ल्यात मुलीच्या सुद्धा हाताला जखम झाली असून तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला.

या घटनेनंतर विश्वास कळमकर यांच्या फिर्यादीवरून शिवाजी माळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक रोड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com