त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून परिचारिका दिनानिमित्त १०० पीपीई किटचे वाटप
स्थानिक बातम्या

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून परिचारिका दिनानिमित्त १०० पीपीई किटचे वाटप

Gokul Pawar

Gokul Pawar

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस पीपीई किटचे वाटप करण्यात आले.

दरम्यान राज्यभरात किटचा तुटवडा भासत असून अशातच काही मदतीचे हात पुढे येत आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून परिचारिका दिनानिमित्त येथील डॉक्टर्स व नर्सेस यांना पीपीई किट वाटप करण्यात आले.

तसेच १०० पीपीई किट व १०० एन नाईंटी फाईव मास्क व १०० फेस शील्ड व दोन रक्तदाब मोजणी सयंत्र भेट स्वरूपात देण्यात आले. त्याप्रसंगी डीवायएसपी ढोले, मंदिराचे विश्वस्त संतोष कदम, सत्यप्रिय शुक्ल, प्रशांत गायधनी, पंकज भुतडा, तृप्ती धारणे दिलीप तुंगार तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com