हरसुलच्या शिवभोजन थाळी केंद्रास पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रतिसाद
स्थानिक बातम्या

हरसुलच्या शिवभोजन थाळी केंद्रास पहिल्याच दिवशी नागरिकांकडून प्रतिसाद

Gokul Pawar

Gokul Pawar

हरसूल :

हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर) येथे सुरू करण्यात शिवभोजन थाळी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी पहिल्याच दिवशी उत्स्फूर्तपणे नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तसेच लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर ,विद्यार्थी उपाशी राहू नये तसेच गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन हरसूल येथे शिवभोजन थाळी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला असून पहिल्याच दिवशी नागरिकांनी प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.

तालुका पातळीवरील शिवभोजन थाळी हा उपक्रम हरसूल सारख्या ग्रामीण भागात राबविल्याने नक्कीच फायदा होणार आहे. हरसूल येथील शनी मंदिर चौकाच्या शेजारील (गोडावुन पाडा) येथील ग्रामपंचायतिच्या एका गाळ्यात या शिवभोजन थाळीचा शुभारंभ करण्यात आला आहे.

आदिवासी भागात या पाच रुपये शिवभोजन थाळीचा भुकेल्या व गरजू नागरिकांना या उपक्रमाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com