Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा; २४९ हेक्टरवरील पिके आडवी

निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा; २४९ हेक्टरवरील पिके आडवी

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला असून हळुहळू नुकसानीचा आकडा वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने नूकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून २३९ हेक्टरवरील उभी पिके झोपली आहे. ऊस, डाळिंब व भाजीपाल्याला सर्वाधिक तडाखा बसला आहे. तर वीज पडून व वादळामुळे लहान मोठी ७३ जनावरे दगावली आहे. तर पाचशेहून अधिक कच्ची व पक्की घरांची पडझड झाली आहे. नुकसानिचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला असून मदतीकडे लक्ष लागून आहे.

बुधवारी (दि.३) चक्रीवादळामुळे जिल्ह्यात तब्बल ९९५ मिलीमीटर इतका तुफान पाऊस झाला. चक्रिवादळानंतर त्याने मागे सोडलेल्या खुणा ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. वादळाने होत्याचे नव्हते केले असून शेतकर्‍यांच्या डोळयात अश्रू आणले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नूकसानीचे पंचनाम्याचे आदेश दिले. पालकमंत्री भुजबळ यांनी नुकसानीचे त्वरीत पंचनामे करा जेणेकरुन तत्काळ मदत देणे शक्य होईल अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर तत्काळ जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय पंचनामे करण्यात आले. चक्रिवादळाने जिल्ह्याला जोरदार तडाखा दिल्याचे चित्र नुकसानीच्या आकडेवारीहून पहायला मिळत आहे. ४० ते ५०किमी ताशी वेगाने वाहणारे वाहने व तडाखेबंद पाऊस यामुळे शेत पिक व शेतातून काढलेल्या मालाचे अतोनात नूकसान झाले.

- Advertisement -

जिल्ह्यात २३९.७७ हेक्टरवरील पिके आडवी झाली आहेत. सर्वाधिक नूकसान सिन्नर व दिंडोरी तालुक्यात झाले आहे. कांदा, डाळिंब, ऊस, टोमाॅटो व भाजिपाल्याचे झाल्याचे पहायला मिळत आहे. पोल्ट्रीफर्म, पाॅलीहाऊस व कांदा चाळी जमीनोदोस्त झाल्या आहेत. तसेच गाई, म्हशी, बोकड, शेळ्या व मेंढया दगवण्याचे प्रमाण जादा आहे. जिल्ह्यात ७३ जनावरे दगावली आहेत. बागलाणमध्ये सर्वाधिक पशुधनाचे नूकसान झाले अाहे. करोना संकटामुळे अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी चक्रिवादळामुळे जवळपास उध्दवस्त झाला आहे.

घरांची मोठया प्रमाणात पडझड
जोरदार वारा व मुसळधार पाऊस यामुळे घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. ३६ पक्की घरांचे नूकसान झाले आहे. तर ४७५ कच्च्या घरांना वादळाचा फटका बसला.तर ४ झोपडयांचे नूकसान झाले. घरांचे छत व पत्रे उडणे, भिंत खचणे अशा स्वरुपाचे नूकसान झाले आहे.

नूकसान आकडेवारी
पिके – २३९.७७ हेक्टर
लहान जनावरे – २८
मोठी जनावरे – ४५
कच्ची घरे – ४७५
पक्की घरे – ३६
पाॅली हाऊस – १०
शेडनेट – ११
पोल्ट्री – ६
कांदा चाळी – ७
गोठे – २

- Advertisment -

ताज्या बातम्या