दिंडोरी शहरात वाईन शॉपवर प्रचंड गर्दी; सोशल डिस्टन्सीचा फज्जा

दिंडोरी शहरात वाईन शॉपवर प्रचंड गर्दी; सोशल डिस्टन्सीचा फज्जा

दिंडोरी : शहरात वाईनशॉपीच्या दुकानावर प्रचंड गर्दी उसळली असून सोशल डिस्टन्सीचा फज्जा उडाला आहे. ग्राहकांच्या रांगा रस्त्यावर येऊन पोहचल्या असून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या प्रकाराकडे प्रशासनाची डोळे झाक होत.

शहरात करोनाचा संसर्ग अद्याप झाला नसला तरी सात व्यक्तींना खाजगी रुग्णालयात क्‍वॉरंटाईन करण्यात आले आहे. करोनाची चर्चा शहरात असताना येथील चौकातील प्रतिक वाईन व सोनी वाईन या दोन्ही दुकानामध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे.

वाईन मालकांनी सोशल डिस्टन्सीचा नियम अंमलात न आणल्याने  ग्राहक एकमेंकाला बिलगुण रांगेत उभे रहात आहे. त्यामुळे शासनाच्या  नियमाचे उल्लघन होत आहे. वाईन विकताना जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या नियमाचे भंग होतांना दिसून येत आहे. ग्राहकांच्या रांगा नाशिक-कळवण रस्त्यावर आल्याने वाहनचालकांनाही वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

सामान्य जनतेला कारवाईचा बडगा उघडणारे शासन नेमकी काय कारवाई करते की प्रत्येकी शासकीय नियमाचे उल्लंघन कायद्याच्या चौकटीत बसवते. याकडे प्रामाणिक दिंडोरीकरांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com