विद्यार्थ्यांनो! परीक्षा केंद्रावर जाण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
स्थानिक बातम्या

विद्यार्थ्यांनो! परीक्षा केंद्रावर जाण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : उद्यापासून राज्यात एचएससी म्हणजेच बारावीची परीक्षा सुरु होत आहे. या अनुषंगाने परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी, म्हणजेच परीक्षागृहात विद्यार्थ्यांनी जाण्याआधी काही नियम पाळणं अपेक्षित आहे. त्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी काही नियम लक्षात घेणं आवश्यक आहे. जे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. यासाठी विद्यार्थी आणि पालकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे.

परीक्षा केंद्र : सर्वात आधी आपले परीक्षा केंद्र कोणते आहे, वर्ग क्रमांक कोणता आहे याची माहिती घेणे गरजचे ठरते. एकाच दिवशी अनेक विषयांचे पेपर असल्यानं अनेकदा गोंधळ होतो. अशावेळी परीक्षा गृहात जाण्याआधी १५ मिनिटं परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचून या सर्व गोष्टी तपासणं आवश्यक आहे. जर परीक्षा केंद्रावर काही आपल्या आसन क्रमांकाची गडबड असेल तर तातडीनं शिक्षका व चौकशी कक्षाकडे माहिती पोहचवणे आवश्यक आहे.

ड्रेसकोड : अनेकदा शाळांना ड्रेसकोड असल्याने परीक्षेला जाण्यापूर्वी ड्रेसकोडसहित प्रवेश करावा. तसेच युनिफॉर्मबरोबर शाळेचे आयकार्ड, हॉलतिकिटंही सोबत नेणे आवश्यक आहे.

वेळ : परीक्षेत सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. बऱ्याचदा परीक्षा केंद्रावर उशिरा पोहोचल्यानं पेपर राहिला किंवा पेपरला बसू दिलं नाही अशा तक्रारी समोर येतात. यासाठी पूर्व नियोजन करून वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोहोचाव.

आहार : परीक्षेला जाण्याआधी घरातून निघताना हलके आणि आरोग्यदायी जेवण करून निघाव. सोबत पाण्याची बाटली ठेवावी. भुकेमुळे पेपर लिहिण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

Deshdoot
www.deshdoot.com