Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकरोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कराेना याेद्धांना होमिओपॅथीचा डाेस

रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी कराेना याेद्धांना होमिओपॅथीचा डाेस

नाशिक : करोना व्हायरसच्या संकटापासून सर्वसामान्यांना वाचविण्यासाठी अनेक प्रकारे मेडिकल सायन्सच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात शरीरीतील राेगप्रतिकारक शक्ती वाढविणे, हा एक पर्याय सांगण्यात आला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या पॅथींमधून यावर काय करता येईल, असे विचार सुरू झाल्यावर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मार्ग काढायला प्रयत्न सुरू केले आहेत.

त्यात विशेष करून नाशिक शहरात हाेमिआेपॅथिक डाॅक्टर आशर रशिद शेख यांनी पुढाकार घेऊन राेगप्रतिकार शक्ती कशी वाढू शकते, यासाठी काही आैषधे सुचवली. त्यानुसार त्यांनी रस्त्यावर लढणाऱ्या पोलीस दल, प्रशासकिय आधिकारी व कर्मचाऱ्यांरूपी करोना फायटर्ससाठी ‘इम्युनिटी बूस्टर’ या होमिओपॅथीच्या गोळ्या विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत.

- Advertisement -

स्वयंसेवी संघटनांनीही या उपाययोजनांच्या यशस्वीतेसाठी हातभार लावला आहे.

हा लढा लढणारे पोलिस कर्मचारी, सफाई कर्मचारी तसेच अन्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. हे संकट परतावून लावण्यासाठी अनेक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. आशर यांनी आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार ‘इम्युनिटी बूस्टर’ या औषधी गोळ्यांचा सल्ला दिला आहे.

या गोळ्या जर्मनीहून आयात केल्या जातात. पण गोळ्यांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध नसल्याने शहर पाेलीसांनच्या सहकार्याने मुंबईला विशेष वाहन पाठवून साहित्य नाशिक येथे उपलब्ध झाले. त्यामुळे क्लिनिकमध्येच गोळ्यांची निर्मिती करण्यात येत आहे. कोरोना फायटर्सना या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

२० हजार गाेळ्यांचे वाटप

डाॅ. आशर यांनी आत्तापर्यंत १८ ते २० हजार गाेळ्या विनामूल्य वाटप केल्या आहेत. अजूनही गाेळ्या बनविण्याचे काम सुरू असून त्याचे वाटप सुरू आहे.

ठाणे, कल्याण व नाशिक येथील पाेलीस कर्मचाऱ्यांना या गाेळ्या देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दरी, माताेरी व अन्य भागात बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना गाेळ्या देण्यात आल्या अाहेत.

डाॅ. आशर रशिद शेख, हाेमिआेपॅथिक डाॅक्टर.

- Advertisment -

ताज्या बातम्या