स्थानिक बातम्या

‘या’ पिकअप पॉईंटसवर मिळणार घरपोच भाजीपाला; ‘सह्याद्री’ फार्मचा पुढाकार

Gokul Pawar

Gokul Pawar

‘या’ पिकअप पॉईंटसवर मिळणार घरपोच भाजीपाला; ‘सह्याद्री’ फार्मचा पुढाकार  शेतकऱ्यांनी एकत्र येत सुरू केलेली “सह्याद्री फार्म” ही कंपनी आपल्या शेतातून सुरक्षित आणि निरोगी फळे आणि भाजीपाला ऑनलाईन मागणी केल्यास आपल्या जवळच्या पिकअप पॉईंटसवर उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे नागरिकांनी फळं, भाजीपाला घेण्यासाठी या सेवेचा लाभ घ्यावा व घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

भाजीपाला आणि फळांची आपल्याला सह्याद्रीच्या कोणत्याही स्टोअरवर मागणी नोंदवणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनीकडून एका आठवड्यांचे साप्ताहिक बास्केट नागरिकांना घरपोच देण्यात येणार आहे. कंपनीकडून लवकरच नाशिक शहराच्या प्रत्येक भागात सेवा देण्यासाठी डिलिव्हरी व्हॅनही सुरू
करण्यात येणार आहे. किमान मानवी संपर्क व्हावा आणि आपणा सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीकडून खास व्यवस्था केली आहे. त्यामुळे नागरिकांनी निखिल कातकाढे (+917066020407), प्रथमेश चव्हाण ( 960773677) यांच्याशी संपर्क साधावा. या सेवेत घरपोच माल दिल्यावरच निवडलेल्या पर्यायाप्रमाणे किंमत अदा करावयाची आहे.

भाजीपाला बास्केट पर्याय ‘अ’(साधारणत: 10 किलो)
कॅप्सिकम ग्रीन (500 ग्रॅम)
कोबी (1 पीसी)
फुलकोबी (1 पीसी)
कोथंबिरी पॅक (250 ग्रॅम)
पाने (मेथी / पालक) पॅक (500 ग्रॅम)
कांदा रेड पॅक (२ किलो)

टोमॅटो पॅक (1 किलो)
बटाटा पॅक (२ किलो)
गाजर (500 ग्रॅम)
लिंबू (5 पीसी)
लसूण (250 ग्रॅम)
काकडी (500 ग्रॅम)
मिरची (250 ग्रॅम)
किंमत रुपये 500/- मात्र

भाजीपाला बास्केट पर्याय ‘ब’ (6.5 किलो)
कॅप्सिकम ग्रीन (500 ग्रॅम)
कोबी (1 पीसी)
फुलकोबी (1 पीसी)
कोथंबिरी पॅक (250 ग्रॅम)
कांदा रेड पॅक (१ किलो)
टोमॅटो पॅक (500 ग्रॅम)
बटाटा पॅक (1 किलो)
लिंबू (5 पीसी)
लसूण (250 ग्रॅम)
काकडी (500 ग्रॅम)
मिरची (250 ग्रॅम)
किंमत रुपये 350/- मात्र

पिक-अप पॉइंटस
आकाशवाणी टॉवर, गंगापूर रोड : 8888599981,
गोविंदनगर : 9970411522,
नाशिक रोड : 9423802955,
तपोवन लिंक रोड, काठे गल्ली : 9604888868,
अशोका मार्ग : 9370010616,
आनंदवल्ली : 9579131456.

या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांची कंपनी म्हणून ‘सह्याद्री फार्म’ने प्रशासनाला सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे. असाच प्रकारे शासन,प्रशासन व जनता एकत्रितपणे एकमेकांना आधार देवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com