Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदेवळा : देना बँक मित्राकडून लॉकडाऊन काळात घरपोच बँकिंग सेवा

देवळा : देना बँक मित्राकडून लॉकडाऊन काळात घरपोच बँकिंग सेवा

वाजगाव : देवळा तालुक्यातील देना बँकेच्या बँक मित्रांकडून सध्या गावोगावी सेवा दिली जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच ग्रामस्थांकडून देना बँक मित्राचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या संपूर्ण देशावर करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील आठवड्यापर्यंत लॉक डाऊन असणार आले. परिणामी नागरिकांची लॉंकडाऊन काळात उपासमारी होऊ नये म्हणून रेशन दुकानामार्फत मोफत तांदूळ व जन धन अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात रु.५०० जमा करणयात येत आहेत. यामुळे लॉक डाऊन च्या काळात घरखर्च चालवण्यासाठी पुरेसे मिळत आहेत. यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी वाढू लागली आहे. त्याचबरोबर अन्य नागरिकांनीही पैसे काढण्यासाठी बँकाबाहेर मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे.

- Advertisement -

दरम्यान बँकेत तथा शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांना आपल्या खात्याचे पैसे त्यांच्या गावी मिळावे या उद्देशाने देवळा येथील देना बँकेने आपले बँक मित्र (BC) यांचेमार्फत गावोगावी सेवा सुरु केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सध्या गावातील बँक खातेदारांना तालुक्याच्या गावी जावून पैसे काढण्यापेक्षा आपल्या गावात आधार बेस पैसे उपलब्ध करून दिले जात आहेत. यात खातेदारांना एका वेळी जास्तीत जास्त १० हजार काढणे व जास्तीत जास्त २० हजार भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यात देना बकेच्या बँक मित्रा मार्फत महाराष्ट्र बँक खातेदारांना पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने बँक मित्र यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

गावोगावी सेवा देत असतांना प्रत्येक पैसे काढण्यासाठी किंवा भरणा करण्यासाठी आलेल्या खातेदारांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून त्यांचे हात निर्जंतुकीकरण करूनच बँक मित्र सेवा देत आहेत. यासाठी बँकेने बँक मित्रांसाठी सैनिटाइजर पुरविण्यात आले आहे.

पोलिसांच्या काठीपासून बचाव तर वेळेची बचत
सध्या लॉकडाऊन असल्याने घराबाहेर अति महत्वाच्या काम करण्यासाठी जाण्यात मुबा दिली आहे. बाहेर दिसल्यास पोलिसांच्या काठीचा चोप बसतो, यामुळे गावात बँकेची सुविधा मिळत असल्याने पोलिसांच्या काठीपासून बचाव होतो. तर गावात त्वरित पैसे मिळत असल्याने बँकांमध्ये गर्दी तासनतास ताटखळत उभे जाण्याची आवश्यता नाही. परिणामी वेळेची बचत होते.

बँक व्यवस्थापकांच्या सूचनेनुसार गावातच खातेदारांना आधार बेस पैसे उपलब्ध करून देत आहे. यात देना बँकेच्या खातेदारांना पैसे काढणे किंवा भरण्याची सुविधा आहे तर सध्या महाराष्ट्र बँकेच्या खातेदारांना फक्त पैसे काढण्याची सुविधा चालू आहे.
-सुरेश देवरे, देना बँक मित्र

सध्याच्या परिस्थितीत देना बँकेने बँक मित्रामार्फत गावात पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. किरकोळ पैसे काढण्यासाठी देवळा जाण्यासाठी सध्या बस व अन्य वाहने वाहतून बंद असल्याने गावात पैसे मिळत असल्याने देना बँकेचे आभारी आहोत.
-कामिनी सुर्यवंशी, देना बँक खातेदार वाजगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या