हतगड : धुळवडीला निसर्गाच्या रंगाची उधळण; युवकांनी घेतली शपथ
स्थानिक बातम्या

हतगड : धुळवडीला निसर्गाच्या रंगाची उधळण; युवकांनी घेतली शपथ

Gokul Pawar

सुरगाणा : तालुक्यातील खोकरविहीर येथील युवाकाणी धुलीवंदन व रंगपंचमीसाठी चायना व रासायनिक रंग वापरता होळी साजरी करण्याची शपथ घेतली. यासोबतच नैसर्गिक होळी साजरी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दरम्यान अवघ्या दोन दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. यानिमित्त तयार करण्यात येणाऱ्या विविध चायना रंगात घातक रासायनिक घटक मिसळले जातात. त्याचा शरीरावर व आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे रंगाची उधळण करण्यासाठी रासायनिक रंगापेक्षा खास नैसर्गिक रंगाचा वापर करावा अशी शपथ येथील युवकांनी घेतली आहे.

तसेच सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले असून अनेक लोकांचा यात बळी गेला आहे, म्हणून खबरदारी उपाय योजना म्हणून चायना रंग न वापरण्याचा व पाण्याचा अपव्यय टाळण्याचा तसेच पाणी बचतीची शपथ घेण्यात आली आहे. या शपथ विधी प्रसंगी श्री. मनोहर जाधव, योगेश गवळी, धर्मराज गारे, कृष्णा जाधव, राहुल महाले, मनोज जाधव, मोहन गायकवाड, सुरेश गवळी, सुनील गायकवाड, शांताराम महाले, युवराज जाधव आदी युवक उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com