यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

नाशिक : कोरोना च्या संकटाला तोंड देण्यासाठी एकीकडे शासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना, अनेक दानशूर संस्था पुढे येऊन या संकटकाळात सरकारला मदत करत आहेत. अशातच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून तब्बल १० कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला आहे.

देशावर आलेल्या कठीण प्रसंगात यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ देखील मदतीचा खारीचा वाटा उचलत असल्याचं कुलगुरू ई वायूनंदन यांनी सांगितलं आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद विद्यापीठाकडून देण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून १० कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखील ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ ’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com